मिलिंद शिंदे आणि देवेंद्र भगत च्या मुख्य भूमिका असलेल्या वेडं प्रेम या चित्रपटाचा नुकताच मुहूर्त पार पडला. संकल्पना, लेखन, गीत, दिग्दर्शन अशा सर्व भूमिका सागर वानखेडे पार पाडत आहेत. या वेळी मुके शब्द.... शब्द मनातले या काव्य संग्रहाचे प्रकाशन सुध्धा झाले. या मुहूर्ताला मिलिंद शिंदे, देवेंद्र भगत, निर्माते मेघराज राजे भोसले, आगामी "योद्धा" चित्रपटाचे निर्माते एम. के धुमाळ सुध्धा उपस्थित होते.