Editorial

"कॉर्पोरेट" जमान्याची कहाणी- प्रेमसूत्र"

कॉर्पोरेट हा शब्द किती कॉमन झालाय नाही आज काल?? ह्याच कॉर्पोरेट जगातील तरुण तरुणी किती career oriented झाले आहेत हे दाखवण्यासाठी येत्या २१ जूनला चंदेरी पाड्यावर उतरणार आहेत संदीप कुलकर्णी आणि पल्लवी सुभाष मुख्य भूमिकेत, "प्रेमसूत्र" या चित्रपटातून...

 

"क्षितीज एन्टरटेनमेंट" आणि "फिन क्राफ्ट" ची ही निर्मिती असून तेजस विजय देऊस्कर यांचे दिग्दर्शन या चित्रपटास लाभले आहे...संदीप कुलकर्णींची ही संकल्पना आहे जिला कथेत व पटकथेत मांडण्याचे काम प्रसाद मिरासदार आणि तेजस विजय देऊस्कर यांनी केले, तर संवाद लेखन महेंद्र तेरेदेसाई यांचे आहे.

 

या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे एक परंपरा जपणारी, निसर्गाशी हितगुज करणारी व मुक्तपणे जीवन जगणारी तरुण मुलगी, जी काही कारणास्तव एका कॉर्पोरेट शहरात जाते व तिकडच्या वातावरणाशी जुळण्याचा प्रयत्न करत कसा सगळ्या परिस्थितींचा सामना करते...  

 

पाड्यावर, सांदिप आणि पालवी सोबात आपल्याला इला भाटे, श्रुती मराठे, लोकेश गुप्ते, शिशीर शर्मा, शुभ खोटे, प्रसाद पंडित, प्रदीप आठवले आणि अजुन नावाजलेले कलाकार दिसणार आहेत.

चला तर मग.. सज्ज व्हा एका नवीन युगातील प्रेम कहाणी, राजाराम परमार आणि विस्वास जोशी निर्मित "प्रेमसूत्र" पाहण्यास येत्या २१जूनला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात, ज्याचं सादरीकरण करणार आहे संदीप कुलकर्णी आणि तेजस देऊस्कर यांची "कथाकार" ही संस्था.....